सामाजिक कार्याने प्रेरित होऊन सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक वैद्यकीय इत्यादी
उद्देशासाठी येमाईमाता शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा संघ कवठे (येमाई)या नावाने संस्था स्थापन करण्यात आली आहे
संस्थेचे उद्देश:
  • संस्थेच्या मार्फत समाजाच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम पार पाडणे, समाजाचा सर्वांगिन सामाजिक विकास करणे, पर्यावरण स्वच्छता याकडे विशेष लक्ष पुरवणे.
  • इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळा सुरु करणे, व्यामध्ये नर्सरी (सिनअर व ज्युनिअर केजी) अंगणवाडी, बालवाडी, पूर्वप्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक, महाविद्यालय, उच्च शिक्षण इ. वसर्व प्रकारचे शिक्षण की ज्या विद्यार्थ्यांना त्याच्या भावी आयुष्यात उपयोग होईल, असे मार्गदर्शनपर शिक्षण देणे. सर्व स्तरावरील निवासी व अनिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम सुरु करणे, अंध, अपंग, मुकबधिर, कर्णबंधिर, मतीमंद यांच्यासाठी शाळा सुरु करणे.
  • विविध क्रीडाविषयक उपक्रम घेणे, विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करणे व पार पाडणे, नवनवीन खेळास प्रोत्साहन देणे, क्रीडाविषयक मार्गदर्शन करणे. उदा. मल्लखांब, कबड्डी, खो खो, हॉली बॉल, फुट बॉल इ. तसेच आधुनिक साहित्य सामुग्रीनेयुक्त अशी अदयावत व्यायामशाळा व जलतरण तलाव युवकांसाठी सुरु करणे. क्रीडा विकासास चालना देणे.
  • गरिब, होतकरू, हुशार, मुलांसाठी शालेय साहित्याचे वाटप करणे, उदा. वह्या, पुस्तके, कपडे, शैक्षणिक साहित्य इ. तसेच गुणवंत विद्यार्थाना शिष्यवृत्ती देणे. तसेच अत्यंत गरीब व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन वार्षिक शालेय खर्च करणे व इतर मदत करणे.
  • ग्रामीण शेतकरी बाधवांसाठी शेतीतंत्राची अत्याधुनिक माहिती व नविन तंत्रज्ञान याबाबत माहिती पुरविणे. शेतीविषयक व्याख्याने आयोजित करणे. चर्चासत्र, परिसंवाद, कार्यशाळा शिबिर, मेळावे, प्रदर्शन इ. आयोजित करणे, शेती तज्ञांचे मार्गदर्शन शेतक-यांना मिळतून देणे. बि-बियाणे, खते, जंतुनाशके, औषये, अवजारे, मशागतीच्या पद्धती, पिक, संरक्षण, धान्यसाठवण इ. विषयी सखोल माहिती व ज्ञान उपलब्ध करुन देणे,
  • संस्थेमार्फत विविध सामाजिक व जनहितोपयोगाची कामे करणे, सुशिक्षित महिला व युवकांना रोजगार देणे कामी मार्गदर्शन करणे. तसेच समाजातील दुर्बल घटकांना कायदे विषयक ज्ञान उपलब्ध करुन देणे. विविध योजना लोकांपर्यंत पोहचविणे,
  • संस्थेमार्फत परिसराचा सामाजिक विकास करणे. स्वच्छता अभियान कार्यक्रम सुरु करणे, परिसरात वृक्षारोपन करणे. पर्यावरण समतोल राखणे. पर्यावरणाविषयी जनजागृती करणे. वनीकरणाच्या माध्यमातून प्रदूषण मुक्त वातावरण निर्माण करणे.
  • विविध सामाजिक कार्यक्रम घेणे उदा. व्यसनमुक्ती, एडस् निर्मुलन, वृक्षारोपण, वृध्दाश्रम, साक्षरता अभियान, प्रौढ साक्षरता वर्ग, कुटुंबनियोजन व आरोग्यशिबिर, रक्तदान व नेत्रदान शिबिर, मोफत चश्मे वाटप, ब्लड बैंक, नारी समता मंच, अध्यात्मिक केद्र, सामुदायिक विवाह सोहळा, युवकांसाठी स्वयंरोजगार योजनेसंबंधी मार्गदर्शन, नवविवाहीत दाम्पत्यांना मार्गदर्शन, गर्भ संस्कार शिबिर व मार्गदर्शन इत्यादी.
  • आधुनिक शेती, शेतकरी प्रशिक्षण योजना सुरू करणे. नोंदणीकृत शेती विषयक काम करणाऱ्या सेवाभावी संस्थाना तांत्रिक मार्गदर्शन करणे वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, वन्यजीव संवर्धन इत्यादी उपक्रम हाती घेणे. शेतकऱ्यांसाठी व त्यांच्या हितासाठी उदयोग व्यवसाय व प्रशिक्षण शिबिर वेळोवेळी आयोजित करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे तसेच शेती व शेती पूरक मालाचे उत्पादन प्रक्रिया व विक्री संबंधी शेतक-यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे.
  • दुष्काळ, पुर, भूकंप, आग, युध्द, वादळ, मोठी शस्त्रक्रिया इत्यादी आपत्तीत सापडलेल्या आपादग्रस्तांना सर्वतोपरी मदत व सहकार्य करणे, तसेच मानव निर्मित संकटात सापडलेल्या कुटुंबियांचे तातडीने व दिर्घमुदतीचे पुनर्वसन करणे. त्यासाठी मार्गदर्शन करणे. आपत्ती व्यवस्थापन विषयक कामे करणे.
  • शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची माहिती उपलब्ध करुन देणे. उदा. दुग्धव्यवसाय, मत्स्यशेती,वराहपालन,मधमाशीपालन, कुक्कुटपालन, शेळी मेढी पालन इ. उपक्रमाबाबत व यासंबंधित शैक्षणिक कोर्सेस घेणे.
  • महिलांसाठी विविध कल्याणकारी उपक्रम सुरु करणे, त्यामध्ये भरतकाम, विणकाम, शिवणकाम, संगणक, हॉटेल मॅनेजमेंट, पाककला उदयोग प्रशिक्षण, खादय पदार्थ निर्मिती, फेशन डिझायनर, संस्कार वर्ग, ब्युटी पार्लरचे कोर्सेस, हेल्थ क्लब, मेहंदी, रांगोळी, चित्रकला, हस्तकला, श्रमिक, पेन्टींग इत्यादींचे कोर्सेस/प्रशिक्षण वर्ग आयोजित करुन महिलांना प्रशिक्षित करणे.व विविध उपक्रमातून महिला सक्षम कार्यक्रम करणे. तसेच महिलांमध्ये उदयोजकता वाढीस चालना देणे.
  • महिलांना स्वावलंबी बनविण्याकरिता त्यांना घरगुती व्यवसायाचे प्रशिक्षण माहिती मार्गदर्शन करणे. तसेच बेरोजगार तरुणांना नोकरी विषयक किवा व्यवसाय विषयक मार्गदर्शन करुन त्यांना रोजगार उपलब्ध करण्या विषयी माहिती पुरविणे.
  • ग्रामीण भागातील गरीब महिलांना स्वत च्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांच्यामध्ये सुप्त कला गुणांना चालना देऊन क्षमता विकास करणे. ग्रामीण विकास या विषयी संपूर्ण माहिती महिलांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून पुरविणे. ग्रामीण विकास या विषयी संपूर्ण माहिती ही महिलांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून पुरविणे.
  • लहान मुलांसाठी बालसंगोपन, बालसदन व पाळणाघर सुरु करणे. आश्रमशाळा व अनाथाश्रम सुरू करणे निराधार महिलाना आधार देण्यासाठी महिला निराधार आश्रम स्थापन करणे व महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे कामी मार्गदर्शन करणे.

श्री. नवनाथ सांडभोर

अध्यक्ष

प्रसिद्ध उद्योजक नवनाथ सांडभोर क्लबचे अध्यक्ष या नात्याने ते क्लबची दिशा आणि धोरणे ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि संस्थेच्या उच्चस्तरीय निर्णयांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतात.

डॉ. सांतोष उचाळे

उपाध्यक्ष

श्री. दीपक सांडभोर

खजिनदार

श्री.संजय चौधरी

सचिव

श्री. विनायक गोसावी

सह-सचिव

श्री. अमोल शिंदे

संचालक

श्री.अनिल रायकर

संचालक

श्री. सुरेश गायकवाड

संचालक

श्री.संतोष मुखेकर

संचालक

श्री.कमलेश बोरा

संचालक

श्री. भूपेंद्र चौधरी

संचालक

श्री.राजेंद्र चाटे

तज्ञ् संचालक

श्री.विठ्ठल दुडे

तज्ञ् संचालक

श्री.प्रभाकर गावडे

सदस्य

श्री.नितीन मुखेकर

सदस्य

श्री.संपतराव कांदळकर

सदस्य

श्री. रामदास रोहिले

सदस्य

श्री. नामदेव सांडभोर

सदस्य

श्री. श्रीराम इचके

सदस्य

श्री.गोपीनाथ रायकर

सदस्य

श्री.पवन जाधव

सदस्य

श्री.सागर मुखेकर

सदस्य

श्री.सोपान वागदरे

सदस्य

श्री.मोहन मुखेकर

सदस्य

डॉ. निखिल इचके

सदस्य

डॉ. प्रवीण भालेराव

सदस्य

श्री.निलेश पोकळे

सदस्य

प्रतीक चौधरी

सदस्य

डॉ. स्वप्नील पवार

सदस्य

श्री. कल्पेश कोठारी

सदस्य

श्री. संदीप वागदरे

सदस्य

श्री.निलेश सांडभोर

सदस्य

श्री.राकेश बोरा

सदस्य

श्री. विजय बगाटे

सदस्य

श्री. धनंजय साळवे

सदस्य

श्री. निलेश धर्माधिकारी

सदस्य

श्री. सोनभाऊ पोकळे

सदस्य

श्री.सुभाष इचके

सदस्य

श्री. प्रवीण बाफना

सदस्य

श्री.मधुकर खोल्लम

सदस्य

श्री.सुनील हिरामण पोकळे

सदस्य

श्री.संतोष वागदरे

सदस्य

डॉ. शुभम बाराहाते

सदस्य

PSI सुहास रोकडे

सदस्य

डॉ.अविनाश रोकडे

सदस्य

श्री. संतोष काळे

सदस्य

  • Kavathe, Pune, Maharashtra, India
  • 412218
1000

Donation Amount